लातूर | राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. उमेदवारांकडून मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या जात आहेत. प्रचारसभांचे आयोजनही केले जात आहेत. पण अशाच एका प्रचारसभेत एका व्यक्तीने पत्नीसाठी भाषण केले. जेव्हा ते खुर्चीवर बसले, त्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
लातूरमधील मुरुड गावात ही धक्कादायक घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सध्या राज्यभरामध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. प्रचारसभेत पत्नीसाठी भाषण केले. त्यानंतर खुर्चीवर बसल्यानंतर काही क्षणात या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर ते स्टेजवरच कोसळले. रुग्णालयामध्ये दाखल करण्यापूर्वीच या व्यक्तीला मृत घोषित करण्यात आले.
मुरुडमधील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मुरुड परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून अमर नाडे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यांची पत्नी अमृता या सरपंचपदाच्या उमेदवार आहेत.