मुंबई | ”भाजपच्या काही नेत्यांचे मेंदू किड्या-मुंग्याचे आहेत, हे दुर्दैवाने म्हणावं लागतं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्राचे सुपुत्र नाहीत का? जन्म देशातच झाला”, असे विधान शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले.
संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महाराष्ट्रात झाल्याचे म्हटले होते. त्यावरून भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी ट्विट करत संजय राऊत यांच्यावर टीका केली होती. त्यावर संजय राऊत यांनी भाष्य केले. ते म्हणाले, ”भाजपच्या काही नेत्यांचे मेंदू किड्या-मुंग्याचे आहेत, हे दुर्दैवाने म्हणावं लागतं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्राचे सुपुत्र नाहीत का? त्यांचा जन्म देशातच झाला आहे”.
तसेच 1891 मध्ये महू भागात जे आता मध्यप्रदेशात आहे. तेव्हा मध्यप्रदेश नव्हते. भाषिक राज्य कधी निर्माण झाली याचा अभ्यास करावा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला तेव्हा देशात कुठलेही राज्य नव्हते, असेही त्यांनी सांगितले.