नवी दिल्ली | देशात इंधनाचे दर मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. असे असताना आता या इंधनाच्या दरात कपात करण्यात आली आहे. त्यामुळे आता सामान्य नागरिकांना काहीसा दिलासा मिळू शकेल.आंतरराष्ट्रीय बाजारात आज कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाली आहे. त्यामुळे जवळपास ३ महिन्यांनंतर अनेक राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत घट झाली आहे.
महाराष्ट्रात पेट्रोलचे दर 57 पैशांनी कमी होऊन 105.96 रुपये प्रति लिटर झाले आहेत. राज्यात डिझेल 54 पैशांनी घसरुन 92.49 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. तर मध्य प्रदेशातही इंधन स्वस्त झाले आहे. पेट्रोल 30 पैशांनी स्वस्त झाले असून, 109.70 रुपये प्रति लिटर तर डिझेल 28 पैशांनी स्वस्त झाले असून, 94.89 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे.
पुण्यात पेट्रोलचा दर 106.17 रुपये असून, डिझेल 92.68 रुपयांवर आहे. नाशिकमध्ये पेट्रोल 106.76 रुपयांवर असून, डिझेलचा भाव 93.26 रुपये आहे.