मुंबई | ”सरकारचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. शिवजयंतीपूर्वी महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ होणार हे नक्की”, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केले आहे.
राज्यात भाजपच्या पाठिंब्यावर शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. त्यानंतर विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीका केली जात आहे. तसेच हे सरकार कोसळेल असे अनेकदा विरोधकांकडून म्हटले जात आहे. त्यानंतर आता अमोल मिटकरी यांनी ट्विट करत राज्यात सत्तांतर होण्याबाबत विधान केले आहे. ”सरकारचे काऊंटडाऊन सुरू. शिवजयंतीपूर्वी महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ होणार हे नक्की”.
शिवसेनेचे (ठाकरे गटाचे) खासदार संजय राऊत यांनीही फेब्रुवारीमध्ये सरकार कोसळणार असं भाकीत वर्तवलं आहे. पण, आता सरकारचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे, असे मिटकरी यांनी म्हटले आहे.