मुंबई | भाजपचे अद्वय हिरे यांनी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत आणि विनायक राऊत यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केला आहे. या प्रवेशाने भाजपपेक्षा जास्त शिंदे गटाला धक्का बसला आहे.
अद्वय हिरे यांनी शिंदे गटाचे दादा भुसे यांच्या विरोधात दंड थोपटले आहे. हिरे कुटुंब संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अग्रेसर राहिले आहे. हिरे कुटुंबाच्या अस्तित्वाला दादा भुसे यांनी सुरुंग लावला व त्यांच्या राजकीय कारकिर्दीत खळबळ उडवली. हिरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्याने शिंदे गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे.
अद्वय हिरे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश करताना उद्धव ठाकरे यांचा माजी आणि भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केला. माझ्या मतदारसंघात भाजपचे अस्तिव नव्हते. ते आम्ही निर्माण केले. मात्र, ५० गद्दार भाजपच्या मांडीवर जाऊन बसले. त्यानंतर भाजपला आमची गरज राहिली नाही.
भाजप शेतकऱ्यांकडे लक्ष देत नाही. जो शेतकऱ्यांचे भले करू शकत नाही अशा पक्षात मी राहू शकत नाही. मी अशा पक्षाचा त्याग केला. पक्षप्रवेश वेळेस अद्वय हिरे यांनी हे वक्तव्य केले.