मुंबई | गेल्या काही दिवसांपासून राज्यातलं वातावरण बिघडलेलं पाहायला मिळत आहे. पक्षांतर्गतच वाद सुरु असल्याने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यायला हवं असं काही महाराष्ट्रसैनिकांचं म्हणण आहे. त्यावर दोन भाऊ एकत्र येण्यापेक्षा एक भाऊ सत्तेत येणं गरजेचे आहे ते म्हणजे राज ठाकरे इतर कोणी नाही असे मत मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे.
त्याचबरोबर फक्त राजकीय पक्षांच्या प्रतिक्रिया घेतल्या जातात, लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या जात नाहीत. त्यामुळेच अशा एक सही संतापाची अशी मोहीम देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून सुरू करण्यात आलेली आहे.
दरम्यान, राज्याची ही परिस्थिती बदलण्यासाठी राज ठाकरे यांना लोकांनी सत्तेत बसवलं पाहिजे. आम्ही या राजकीय चिखलात नाही याचा अभिमान आहे. एका आमदाराचे आम्ही शंभर करू. राजकारणाचा चिखल करणार नाही असंही अमित ठाकरे यांनी म्हटलं आहे.