अशोक सराफ आणि नाना पाटेकर यांच्यातला भन्नाट किस्सा
मैत्रीचे अनेक किस्से आपण ऐकले असतील परंतु जीवाला जीव देणारे सिनेसृष्टीतले मित्र दुर्मिळच पाहायला मिळतात. अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर, महेश कोठारे यांच्या मैत्रीच्या अनेक गोष्टी तुम्हाला माहिती असतील…परंतु अशोक सराफ आणि नाना पाटेकर यांच्या दोस्तीचा हा किस्सा तुम्हाला माहितीय का?
जशी सिनेमात मैत्री दाखवली जाते तशीच मैत्री पडद्यामागे टिकवणारे हे दोघं जिवलग मित्र आहेत. विनोदाचा बादशाह म्हणून ज्याने नावलौकिक मिळवला ते अशोक सराफ त्यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. तर दुसरे केवळ मराठीच नाही तर हिंदी सिनेसृष्टीवर अभिनयाचा ठसा उमटवणारे अभिनय सम्राट नाना पाटेकर.
अशोक सराफ यांनी त्यांच्या ‘मी बहुरूपी’ या पुस्तकातून त्यांच्या नाटकाबाबत अनेक किस्से उलगडले आहेत त्यातीलच एक किस्सा अशोक मामांनी सांगितला आहे. एवढचं नाही तर नाना देखील त्यांचा एक प्रसंग आवर्जून सांगतात.
सदर व्हिडीओमध्ये दाखवलेल्या दोन घटनांमध्येच तुम्हाला अशोक सराफ यांच्या व्यक्तिमत्वाची जाणीव झाली असेल…केवळ रंगभूमी न गाजवता लोकांच्या आणि आपल्या सहवासातील प्रत्येक माणसाच्या मनावर अशोक सराफ यांनी अधिराज्य गाजवलं.. अशा या अफलातून अभिनेत्याला महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल फॉर द पीपल न्यूजच्या सर्व टीम व प्रेक्षकांकडून त्यांचे अभिनंदन!