मुंबई | शासनाकडून पेपर फुटीविषयी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पेपर फुटीनंतर आता कठोर कारवाई केली जाणार आहे…यासाठी केवळ दंडच नाही तर थेट शिक्षा केली जाणार आहे…लोकसभेत या संदर्भात विधेयक देखील मांडण्यात आलं आहे. यासाठी साधा दंड नसून पेपर फुटी करणाऱ्याला तब्बल 1 कोटी रूपयांचा दंड हा भरावा लागणार आहे. पेपर फुटीच नव्हे तर परीक्षा देणाऱ्या उमेदवाराच्या जागी जर दुसरं कोणी परीक्षा देत असेल तर त्याच्याविरोधात देखील कठोर कारवाई केली जाणार आहे.
हा पेपर फुटीचा विधेयक केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी 5 फेब्रुवारी 2024 रोजी लोकसभेत मांडला आहे. जर एखादा व्यक्ती पेपर फुटीमध्ये दोषी आढळला तर त्याला तब्बल 10 वर्षांची कोठडी आणि 1 कोटी रूपये दंड भरावा लागणार आहे.
एवढच नाही तर पेपर फुटीमध्ये एखादी संस्था सहभागी असेल तर त्या संस्थेला (शाळा, महाविद्यालय) पुन्हा परीक्षा घेण्याचा सर्व खर्च उचलावा लागेल आणि कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल. संबंधित संस्थेची मालमत्ता देखील जप्त केली जाईल.
राष्ट्रपतींनी पेपर फुटी प्रकरणात त्यांच्या भाषणात चिंता व्यक्त केली. पेपर फुटीमुळे उमेदवारांना देखील मोठा त्रास हा सहन करावा लागतो. विशेष बाब म्हणजे पेपर फुटी प्रकरणातील तपास हा पोलिस उपअधीक्षक, सहायक पोलिस आयुक्त या दर्जाचे अधिकारी करत असतात. तसेच त्याचा तपास केंद्रीय एजन्सीकडे सोपवण्याचा अधिकार सरकारला असणार आहे यामुळे आता परीक्षा पद्धती पारदर्शकपणे होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.