आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे मैदानात उतरणार असल्याची चर्चा आहे. या आधी वेगवेगळ्या मतदासंघातून त्यांच्या नावाची चर्चा झाली होती..आता पुन्हा एकदा तशीच चर्चा सुरु असताना यावर सुषमा अंधारेंनी स्पष्ट भाष्य केलं आहे..माझं नाव चर्चेत आहे. मात्र मला अधिकृत निरोप नाही. मला फक्त काम करायचं आहे. मुक्त संवादच्या माध्यमातून माझी ती वाट आहे आणि त्यासाठी मी निघाली आहे. पण पक्षाने सांगितलं, तर वाटेल त्या उमेदवाराच्या विरोधात मी लढेल, असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.कल्याण दौऱ्यावर असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्या बोलत होत्या.
सुषमा अंधारे यांनी बोलताना खासदार श्रीकांत शिंदे यांना देखील टोला लगावला. सुषमा अंधारे यांनी म्हटलं की, खासदार श्रीकांत शिंदे हा फारच मोठा अडचणीचा डोंगर आहे, असं का वाटतं? लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी तो अडचणीचाच डोंगर आहे. त्याच्या सामोरं जाताना आम्हाला तो अडचण वाटत नाही.अति गर्भसमिट मुख्यमंत्री शिंदेना आपल्या पोरांना दोन वेळा खासदार करावसं वाटतं. मग काय हरकत आहे? त्यांच्या बाप दादांनी हा महाराष्ट्र घडवण्यासाठी वाढवण्यासाठी रक्ताचे पाणी केलं. महाराष्ट्राची सत्ता मत्ता अस्मिता राहण्यासाठी त्यांच्या पिढ्या येथे घालवल्या त्यांच्या मुलाला मुख्यमंत्री करणं? हे ठाकरे साहेबांची नाही ही सर्व शिवसैनिकांची मागणी आहे, असं म्हणत अमित शाह यांनी आदित्य ठाकरेंवर केलेल्या टीकेला हि अंधारे यांनी उत्तर दिलं आहे.सुषमा अंधारे यांच्या मातृत्व ते शिवतीर्थ मुक्त संवादाचा आजचा 23 वा दिवस आहे. अकरावी लोकसभा कल्याणमध्ये ही यात्रा पोहोचली आहे. तीस दिवसापासून लोकांचे वेगवेगळे प्रश्न समजून घेत आज कल्याणमध्ये पोहोचलो आहोत. मातोश्रीवर याचा समारोप होणार आहे. आज कल्याणमध्ये सभा उद्या ठाण्यात आणि पुढे धारावीमध्ये मोठी सभा होणार आहे, असं सुषमा अंधारे यांनी यावेळी सांगितलं.