इलेक्टोरल बाँड
सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला आणि केंद्रीय निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना दिलेल्या निवडणूक रोख्यांची अर्थात राजकीय देणगीची माहिती जाहीर केली. याबाबतची माहिती सार्वजनिक केल्यानंतर सर्वात जास्त देणगी राजकीय पक्षांना नेमकी कोणी दिली? याची माहिती समोर आली.यामध्ये राजकीय पक्षांना देणगी देण्यात सर्वात आघाडीवर नाव आलं ते सँटियागो मार्टिन यांचं.. या सँटियागो मार्टिन यांनी देणगीच्या स्वरुपात राजकीय पक्षांना तब्बल १,३६८ कोटी रुपयांचा निधी दिलाय.हा आकडा डोकं चक्रावणारा आहे..आता तुम्हाला पहिला प्रश्न हाच पडला असेल कि या व्यक्तीकडे इतका पैसा आला कुठून ? हि व्यक्ती नेमकं करते तरी काय ? त्यांच्याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओतून जाणून घेऊयात…
मार्टिन यांचा काही काळ वादग्रस्त गेला. त्यांना विविध प्रकारच्या गुन्ह्यात अटक देखील करण्यात आली होती. त्यांच्यावर ४,५०० कोटी रुपयांच्या फसणुकीचा आरोप करण्यात आला होता. तसेच त्यांच्या घरावर पोलिसांनी छापे देखील टाकले होते. त्यांची काही संपत्ती देखील जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मार्टिन आणि त्यांच्या कंपनीवर एप्रिल २००९ ते ऑगस्ट २०१० दरम्यानच्या पुरस्कार विजेत्यांच्या तिकीट दाव्याला दिशाभूल करण्याच्या पद्धतीनं सादर करण्यात आल्याचा आरोप ईडीनं केला आहे. ज्यामुळं सिक्कीमचं तब्बल ९१० कोटी रुपयांचं नुकसान झालं होतं. प्रवर्तन निर्देशनालयानं पीएमएलए कायद्याच्या कथित उल्लंघनाप्रकरणी सँटियागो मार्टिन यांच्या कंपनीची आणि तेथील व्यवहारांची चौकशी सुरु केली आहे. आता सँटियागो मार्टिन यांच्याविषयीची बरीच माहिती सध्या टप्प्याटप्प्यानं समोर येत असून, निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीमध्ये मेघा इंजीनियरिंग एंड इंफ्रास्ट्रक्चर लिमिटेडनंही निवडणूक रोखे स्वरुपात ९६६कोटी रुपये राजकीय देणगी म्हणून दिले होते. याशिवाय इलेक्टोरल बॉन्ड खरेदी करणाऱ्यांमध्ये डीएलएफ कमर्शियल डेवलपर्स, वेदांता लिमिटेड, अपोलो टायर्स, एडलवाइस, पीवीआर, स्पाइसजेट, इंडिगो, ग्रासिम इंडस्ट्रीज, मेघा इंजीनियरिंग, पीरामल एंटरप्राइजेज, टोरेंट पावर, भारती एयरटेल या कंपन्यांचाही समावेश आहे.