शिर्डी लोकसभा
शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून भाऊसाहेब वाकचौरे यांना तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनकडून विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे शिर्डीत ठाकरेंची शिवसेना विरुद्ध शिंदेंची शिवसेना असा सामना रंगणार आहे. बंडानंतर शिवसेनेत फूट पडून दोन गट झाले. शिंदेंना शिवसेना नाव व चिन्ह मिळाले तर, उद्धव ठाकरेंना दुसरं नाव व चिन्ह मिळालं.असं असलं तरी दोन्ही मूळचे शिवसैनिकच. त्यामुळं शिर्डी लोकसभा मतदार संघात शिवसैनिकच एकमेकांना भिडणार आहेतभाऊसाहेब वाकचौरे की सदाशिव लोखंडे कुणाची ताकद किती आहे.कुणाच्या काय कमकुवत बाजू आहेत.हेच आपण या व्हिडिओतून पाहुयात..
अहमदनगर जिल्ह्यातील दोन मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ म्हणजे शिर्डी लोकसभा मतदारसंघ. कोपरगाव लोकसभा मतदारसंघाच्या विभाजनानंतर २००८ मध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघ तयार झाला. आणि त्यानंतर इथं पहिल्यांदाच झालेल्या २००९ च्या लोकसभा निवडणुकीपासून ते आतापर्यंत शिवसेनेचं या मतदारसंघावर वर्चस्व पाहायला मिळालं आहे. पण शिवसेनेतील फुटीनंतर त्याठिकाणची राजकीय परिस्थिती बदलली आहे.आणि फुटीनंतरची ही पहिलीच निवडणूक आहे.२०१४ मध्ये उमेदवारीसाठी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये गेलेले माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे पुन्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मध्ये परतले. त्यामुळे त्यांना उद्धव ठाकरेंनी उमेदवारी दिली.