कल्याण लोकसभा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर पाठींबा दिला आहे.राज ठाकरेंनी घेतलेल्या नव्या भूमिकेने मनसैनिकांची मात्र मोठी कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं.राज ठाकरेंनी आपण लोकसभा न लढण्याचं जाहीर केलं आणि लोकसभेची तयारी करत असलेल्या इच्छुक मनसैनिकांमध्ये मोठी निराशा पसरली.काहींनी राज आदेश मान्य केला तर काहींना ही भूमिका पटली नाही.अशा वातावरणात काही जण राज आदेश मानून महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करायला सुरवात करू लागले आहेत..कल्याण लोकसभेत असंच चित्र दिसू लागलंय.महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदेंच्या विजयासाठी राजकीय पटलावर एकमेकांच्या विरोधात असलेले मनसे आमदार राजू पाटील हे मैदानात उतरले आहेत.आता राजू पाटील हे कट्टर विरोधक ते पक्के सहकारी कसे बनले ? जहालवादी भूमिकेतून त्यांना मवाळ भूमिका घेण्याची वेळ का आली ? हेच आपण या व्हिडिओतून पाहू…
कल्याण लोकसभेत शिंदेंची शिवसेना विरुद्ध ठाकरेंची शिवसेना असा सामना रंगणार आहे..महायुतीकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे सुपूत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनाच पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे.त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरेंनी वैशाली दरेकर यांना मैदानात उतरवलं आहे.दोन्ही उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरू आहे.अशात महायुतीचे उमेदवार जिंकून आणण्यासाठी मनसेकडून लोकसभा समन्वयक पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कल्याण आणि भिवंडी लोकसभेची धुरा आमदार राजू पाटील यांच्यावर सोपवण्यात आली आहे.