लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निवडणुकीत एनडीएला ४०० हून अधिक जागा मिळतील, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. तसेच निवडणुकीची घोषणा होण्याआधीच त्यांनी दिल्लीत भाजपा पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेऊन “अब की बार ४०० पार” चा नारा दिला होता.आता लोकसभा निवडणुकीचे चार टप्पे पूर्ण झाले आहेत. उरले आहेत फक्त तीन टप्पे आणि याच पार्श्वभूमीवर ४०० जागा जिंकण्याच्या मोहिमेला भाजप नेत्यांनी वेग दिला आहे. पण ४०० पार कशासाठी, बहुमत मिळवून भाजपला कोणत्या गोष्टी साध्य करायच्या आहेत.. या आकड्यामागील कारणं काय आहेत ? हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेऊ.
देशातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपने २०१९ मध्ये देशातील नऊ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील ५८ लोकसभेच्या जागांवर आपली सर्वोत्तम कामगिरी केली होती. गुजरात, हरियाणा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, दिल्ली, चंदीगड आणि दिव दमण या नऊ राज्यांमध्ये भाजपच्या मतांची टक्केवारी वाढली होती. काही राज्यामध्ये मित्र पक्षांचं पाठबळ मिळालं होतं. आणि या जोरावर २०१९ ला भाजपने ३०३ जागांवर विजय मिळवला होता.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाची त्यावेळी लाट होती.भाजपला २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपेक्षाही जास्त जागा आणि मतांची टक्केवारी २०१९ ला मिळाली होती. २०१४ मध्ये मतांची टक्केवारी ३१ होती तर २०१९ मध्ये ती वाढून ३७ टक्के इतकी झाली. आणि त्यामुळे २०२४ च्या म्हणजेच आत्ताच्या या लोकसभा निवडणुकीत भाजप थेट ४०० पारच्या नाऱ्यावर जाऊन पोहोचला आहे…पण त्याला कारण फक्त मागची टक्केवारीच नाही तर इतर ४ प्रमुख कारणं असल्याचं बोललं जातं…४०० जागांची गरज का यावर भाजप नेते वेगवेगळी कारण देत आहेत.