मुंबई | पावसाळी अधिवेशन सुरू असताना मंत्रालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे. या शेतकऱ्याने स्वत:ला जाळून घेतल्यानंतर तो गंभीर जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल केले होते. आज, या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे.
सुभाष भानुदास देशमुख असे मृत्यू पावलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. सदर शेतकरी हे साताऱ्यातील कांदळगावचे रहिवासी आहेत. या सुभाष भानुदास देशमुख यांनी २३ ऑगस्ट रोजी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी धाव घेत त्या शेतकऱ्याला लागलेली आग विझविली. त्यानंतर पोलिसांनी शेतकरी सुभाष भानुदास देशमुख यांना रुग्णालयात दाखल केले. शेतीच्या वादातून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती.
सुभाष भानुदास देशमुख यांनी आत्मदहन केल्यानंतर गंभीर जखमी झाल्यानंतर त्यांना जीटी रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना जे.जे. रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, आज त्यांचा पावणे बाराच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्लास्टिक सर्जरी विभागाचे डॉक्टर सागर गुंडेवाल यांनी सुभाष देशमुख यांच्या मृत्यूबाबत माहिती दिली. सुभाष देशमुख हे ४५ टक्के भाजले होते. गावाकडे जमीन हडपल्याच्या वादातून त्यांनी आत्महत्येचा केल्याचे प्राथमिक तपासात माहिती पुढे आली होती.