राजकीय नेते अनेकदा भावनेच्या भरात किंवा बोलण्याच्या गडबडीत अनाकलनिय गोष्टी बोलून जातात. अनेकदा त्यांच्याकडून टीका करत असताना निसटती भाषा वापरली जाते तर अनेकदा काही प्रमाणं किंवा वस्तूस्थितीला विभिन्न गोष्टी हे नेते बोलून जातात. असंच काहीसं विधान छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री अब्दुल सत्तारांनी केलंय. छत्रपती संभाजीवगरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याने थैमान घातलाय. अशा परिस्थितीत बिबट्याला पकडण्याचेे आदेश देत असताना अब्दुल सत्तार यांनी बिबट्या हा राष्ट्रीय प्राणी असल्याचं विधान केलं. अब्गुल सत्तारांनी केलेल्या या विधानाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.
अब्दुल सत्तार नेमकं काय म्हणाले?
छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या 15 दिवसांपासून बिबट्यानं धुमाकूळ घातलाय. या बिबट्याला शोधण्याचं काम वनविभागाकडून सुरू आहे. मात्र, अद्यापही बिबट्याला पकडण्यात वनविभागाच्या अधिकाऱ्यांना यश आलेलं नाही. याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता सत्तार यांनी ‘बिबट्या हा राष्ट्रीय प्राणी आहे, त्याचं संरक्षण झालं पाहिजे, त्याला सुरक्षित ठेवण्याचं काम वनविभाग करत आहे. लवकरच या बिबट्याला पकडण्यात यश येईल’ असं विधान केलं. मात्र, ही प्रतिक्रिया देत असताना अब्दुल सत्तारांनी बिबट्याचा राष्ट्रीय प्राणी म्हणून उल्लेख केल्यानं चर्चांना उधाणं आलंय.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री आणि शिवसेना नेते अब्दुल सत्तार हे यापूर्वीही अनेकदा आपल्या विधानांवरून टीकेचे धनी झाले आहेत. यापूर्वी अब्दुल सत्तार महाराष्ट्राचे कृषीमंत्री असताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबद वादग्रस्त विधान केलं होतं. शिवाय हिंदु धर्मातील देवत असणाऱ्या हनुमानाबाबतही अब्दुल सत्तारांनी आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्यामुळे आता पुन्हा एकदा सत्तारांनी केलेल्या विधानावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.