मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने उद्याचा बंद बेकायदेशीर ठरविला आहे. कोणालाही अशा प्रकारचा बंद पुकारता येणार नाही. बंद केला तर अशा पक्षांवर कारवाई करण्याचे आादेश देखील सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. महाविकास आघाडीने उद्या 24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले आहे. यासंदर्भात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती.या याचिकेवर आज दुपारी सुनावणी झाली.मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने उद्याचा बंद बेकायदेशीर ठरविला आहे. कोणालाही अशा प्रकारचा बंद पुकारता येणार नाही. बंद केला तर अशा पक्षांवर कारवाई करण्याचे आादेश देखील सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
वकील गुणरत्न सदावर्ते यांनी न्यायालयात बंदविरोधात आक्रमक युक्तिवाद केला. सदावर्ते म्हणाले, पोलीसांनी आरोपीला अटक केली आहे. दोषी पोलिसांवर सरकारनं कारवाई केली आहे. राज्य सरकारनं SIT स्थापन केली आहे. मग हा बंद कशाला? बदलापूर स्थानकावर झालेल्या दगडफेक घटनेचे, फोटो मी सादर केले आहेत. अश्या प्रकारच्या दगडफेकीचे समर्थन कसं करणार? असा सवाल सदावर्तेंनी केला आहे. तर वकील सुभाष झा न्यायालयात युक्तीवाद करताना म्हणाले की, ‘या बंदमुळे जनजीवन विस्कळीत होणार आहे. सर्वसामान्य जनतेला त्रास होणार आहे. राजकीय पक्षांनी पुकारलेले बंद असंवैधानिक ठरवण्याचा हायकोर्टाला अधिकार आहे’, असा महत्त्वपूर्ण दावा त्यांनी हायकोर्टात केला. दरम्यान हाय कोर्टाने उद्याचा महाराष्ट्र बंद बेकायद ठरवल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली, शिंदे म्हणाले, “लाडकी बहिण योजनेच राजकारण करुन समाजात द्वेष पसरवण्याच काम विरोधक करतायत. बदलापुरची घटना घडल्यानंतर आम्ही सगळ्या लोकांनी मिळून घटनेची गंभीर दखल घेतली. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवू. कुठल्याही परिस्थितीत आरोपीला सोडणार नाही. हे सरकार संवेदनशील आहे” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. “विरोधकाचं काय चालू आहे? राज्यात काहीतरी भंयकर घडवण्याचा प्रयत्न आहे. कोणी म्हणतं बांग्लादेश होईल. पुरोगामी महाराष्ट्रात आहे हा. मतांसाठी, सत्तेसाठी एवढ्या खालच्या पताळीवर जाऊन प्रचार करता. तुम्ही संवेदनशील असाल, तर या दुर्देवी घटनेच राजकारण बंद करायला पाहिजे” असं एकनाथ शिंदे म्हणाले.