गेल्या काही दिवसांपासून महिलांवर सातत्याने होणाऱ्या अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. कोलकत्ता मध्ये झालेल्या महिला डॉक्टरवरील बलात्कार तसेच बदलापूरमधील आदर्श शाळेत दोन अजाण लहान मुलींवर झालेल्या अत्याचार या घटनेचे पडसाद सगळीकडे उमटत आहेत. सगळीकडून या घटनांचा निषेध होत असताना आता सोशल मीडियावर एक पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे. बदलापूरमध्ये ज्याप्रमाणे दोन लहान मुलींवर अत्याचार झाला. त्या घटनेचा राग तसेच भावनिक आक्रोश व्यक्त करत ‘आज जर तुम्ही असता तर, त्या नराधमाला कापला असता’ अश्या प्रकारची आनंद दिघेंची पोस्ट सध्या सोशल मीडिया वर प्रचंड व्हायरल होत आहे.
अनेक मराठी अभिनेत्यांनी ही आपल्या सोशल मीडिया वरून या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. बदलापूर प्रकरणावर अंगावर काटा आणणारी पोस्ट अभिनेता जयेश चव्हाण याने केली आहे ज्यामध्ये आनंद दिघे यांच्या भूमिकेतील अभिनेता प्रसाद ओक यांचा फोटो पोस्ट केला असून ‘आजचा हिंदू तुमचे विचार विसरले! हिंदू झोपलाय त्याला जागा करायला एक दिघे साहेबच हवेत… साहेब या ओ परत तुमच्या बहिणी कुठेच सुरक्षित नाहीत… धर्मवीर…’ असं पोस्टमध्ये लिहिण्यात आलं असून सध्या सोशल मीडियावर ही पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे.