वॉशिंग्टन | ‘प्रेम आंधळं असतं’, असे अनेकदा म्हटले जाते. तसेच प्रेमात अनेक गोष्टी, मर्यादांचाही विसर पडत असतो. याचाच एक प्रत्यय अमेरिकेत राहणाऱ्या जोडप्याबाबत घडला आहे. ‘लाँड्री बॉय’च्या प्रेमात पडली एक तरुणी. होय, ही आहे ‘इंटरेस्टिंग स्टोरी’. तिने तिची लव्ह स्टोरी (Viral Love Story) तिच्या फेसबुकवर पोस्ट केली आहे. आता याच पोस्टची सर्वत्र चर्चा सुरु आहे.
अमेरिकेत राहणारी एरिका या तरुणीने तिची स्टोरी शेअर केली आहे. लाँड्रीसाठीचे कपडे घेणारा तरुण जोश असे त्याचं नाव. या पोस्टमध्ये एरिकाने लिहिले की, ‘जोश आणि मी एका लाँड्री रुममध्ये भेटलो होतो. त्याचवेळी आमच्यामध्ये ओळख वाढली आणि या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. जोशने मला पहिल्यांदा कॉफीनिमित्त भेटायला बोलावले होते. पण जोश हा मला सुरुवातीला अत्यंत लाजाळू वाटला होता. पण जेव्हा आम्ही जास्त भेटायला लागलो तेव्हा आमच्यामध्ये जवळीक वाढून नातेसंबंध घट्ट झाले. आम्ही दररोज एकमेकांना भेटत होतो. आम्ही दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आता आमच्या लग्नाला पाच वर्षे पूर्ण झाले. पण मी अजूनही जोशला ‘लाँड्री बॉय’ म्हणूनच बोलावत आहे.
सोशल मीडियावर विशेष अशी लव्ह स्टोरी व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी याला चांगला प्रतिसाद दिला. अनेकांनी या जोडप्याला शुभेच्छाही दिल्या आहेत. सध्या याचीच चर्चा होत आहे.