पणजी | गोव्यात मिग 29 के हे लढाऊ विमान (MiG Fighter Aircraft Crashed) क्रॅश झाले. गोव्यात नियमित उड्डाण करताना ही दुर्घटना घडली. हे विमान दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर वैमानिकाला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश मिळाले. त्यामुळे वैमानिकाचे प्राण वाचले आहेत. ही घटना विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने झाल्याचे सांगितले जात आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर भारतीय हवाई दलाने याप्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
मिकोयांग कंपनीनिर्मित मिग 29 हे विमान भारतीय सैन्य दलात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. हवाई दलात या विमानांची संख्या सुमारे 70 आहे. हवाई दलासह भारतीय नौदलाकडूनही या विमानाचा वापर केला जातो. मिग 29 हे विमान नियमित उड्डाणासाठी जात असता ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेनंतर लगेचच वैमानिकाला विमानाच्या बाहेर काढण्यात आले असून, त्याला वाचवण्यात यश आले आहे. आता या प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे.
29 जुलैला झाले होते क्रॅश
मिग 29 हे लढाऊ विमान पहिल्यांदा राजस्थान येथील बाडमेर येथे 29 जुलैला प्रशिक्षणादरम्यान दुर्घटनाग्रस्त झाले होते. यामध्ये दोन्ही वैमानिक शहिद झाले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा हे विमान क्रॅश झाले आहे.