कर्मचारी आपल्या भविष्यासाठी अनेकदा विविध प्रकारे गुंतवणूक करत असतात. यामधील एक आहे ‘पब्लिक प्रॉव्हिडंट फंड’ (PPF). या योजनेत पैसे असणाऱ्या व्यक्तिचे पैसे सुरक्षित असतातच पण त्यासोबत त्याला चांगला परतावाही (Return) दिला जातो. पण मॅच्युरिटीपूर्वीच जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर त्याच्या पैशांचं काय होतं? हे अनेकांना माहिती नसेल पण आज आपण याची माहिती घेणार आहोत…
किती मिळेल व्याज?
पीपीएफ अकाउंट 15 वर्षांत मॅच्युअर होत असते. पण हा कालावधीत वाढवता येऊ शकतो. याचा दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे रिटर्न चक्रवाढ व्याजानुसार दिले जाते. म्हणजे जितक्या अधिक काळासाठी पैसे ठेवले जातील, त्याचा फायदाही मोठा असतो. पीपीएफ अकाउंटमधील पैसे हे कर्मचाऱ्याला आरोग्य किंवा शिक्षण या दोन कारणांसाठी काढता येऊ शकते. सरकारकडून 7 ते 8 टक्के व्याज दिले जाते. सध्या 7.1 टक्के दराने व्याज दिले जात आहे.
कर्जही दिले जाते
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड दीर्घ कालावधीसाठी टॅक्स सेव्हिंग इन्व्हेस्टमेंट स्कीम आहे. त्याचा लॉक-इन पीरिअड पाच वर्षांचा आहे. सहा वर्षांनंतर गुंतवणूकदार पैसे काढू शकतात. तिसऱ्या वर्षात या योजनेंतर्गत कर्जाची सुविधा दिली जाते. म्हणजे तीन वर्षानंतर तुम्हाला जमा रकमेवर कर्ज मिळू शकते.
कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास कोणाला मिळणार पैसे?
जर एखाद्या कर्मचाऱ्याचा गुंतवणूकीच्या 8 वर्षांनंतर मृत्यू झाल्यास पीपीएफ खात्यात जमा झालेली रक्कम त्याच्या वारसदाराला मिळते. या परिस्थितीत मॅच्युरिटी पूर्ण होण्यासाठी कोणताही नियम नसतो.
कशी करावी सेटलमेंट?
निधन झालेल्या कर्मचाऱ्याचे कुटुंबीय पीपीएफच्या पैशांची मागणी करू शकतात. जर क्लेमची रक्कम पाच लाखांपर्यंत असेल तर सेटलमेंट नॉमिनेशन, कायदेशीर पुराव्याच्या आधारे करता येऊ शकते. जर रक्कम पाच लाखांपेक्षा अधिक असेल तर कायदेशीर पुराव्याची आवश्यकता असते. जर पुरावा नसेल तर कोर्टाच्या सक्सेशन सर्टिफिकेट सादर करणे गरजेचे आहे.