नवी दिल्ली | नुकतीच अंधेरी पोटनिवडणूक पार पडली. त्यांनतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अचानक दिल्ली दौर्यावर रवाना झाले आहेत. फडणवीस दिल्लीमध्ये केंद्रीय नेत्यांची भेट घेणार आहेत. पण ह्या भेटीमागे नेमक काय कारण आहे हे अद्याप समजले नाही.
गेल्या काही दिवसांपासून अंधेरीच्या पोटनिवडणुकीत भाजपकडून मुरजी पटेल यांच्या नावाची घोषणा करण्यात येत होती. त्यानुसार पटेल यांनी उमेदवारी अर्जही दाखल केला होता. मात्र, ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, अशीच राजकीय स्तरावर चर्चा होती. त्यातच सोमवारी (दि.17) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोन्ही नेत्यांमध्ये बैठक झाली. त्यानंतर अखेर भाजपने आपला उमेदवार लढणार नसल्याचे जाहीर केले. त्यामुळे ही निवडणूक आता बिनविरोध होणार आहे.
दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी पत्र लिहिले होते. त्यानंतर अनेक राजकीय घडामोडी घडल्या. अखेर भाजपच्या वरिष्ठ पातळीवर चर्चा झाल्यानंतर भाजपने आपला उमेदवार मागे घेतल्याची घोषणा केली गेली.
त्यामुळे आता फडणवीस अंधेरी पोटनिवडणुकीबाबत काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.