गुजरात | गुजरात विधानसभा निवडणुकीबाबत आज घोषणा करण्यात आली आहे. निवडणुक आयोगाने आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी गुजरात निवडणूकसंदर्भात भाष्य केलं. गुजरात विधानसभा निवडणुकीबाबत आज घोषणा करण्यात आली आहे. ही निवडणुक दोन टप्प्यात होणार आहे. १ आणि ५ डिसेंबरला गुजरात निवडणुक पार पडणार तर, ८ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.
पहिल्या टप्यात ८९ मतदान पार पडणार आहे. तर दुसऱ्या टप्यात ९३ जागांसाठी मतदान पार पडणार आहे. एकूण १८२ जागांवर निवडणूक होणार आहे. गुजरातमध्ये ४.९ करोड मतदान होणार आहे. महिलांसाठी १२७४ मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे. तर दिव्यांगासांठी खास १८२ मतदान केंद्र उभारण्यात येणार आहेत.
हिमाचल प्रदेश आणि गुजरात विधानसभा निवडणुकीबाबत एकत्र घोषणा होईल असे सर्वांना वाटत होते पण तसे झाले नाही. त्यावेळी निवडणूक आयोगाने गुजरात निवडणुकीबाबत कोणतेही भाष्य केले नव्हते. आतापर्यंत गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुका या एकत्रच झाल्या होत्या.
दरम्यान, गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये आतापर्यंत 1998, 2007 आणि 2012 मध्ये एकाच वेळी विधानसभा निवडणुका झाल्या होत्या. यावेळी निवडणूक आयोगाने एकत्र घोषणा न केल्यामुळे निवडणूक आयोगावर विरोधक टीका करत होते. हिमाचल प्रदेशमध्ये एकाच टप्प्यात 12 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर 8 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.