नवी दिल्ली | टीम इंडिया टी-20 विश्वचषक २०२२ जिंकण्याचा दावेदार मानला जात असताना उपांत्य फेरीत पराभूत झाल्यानंतर संघाला बाहेर पडावे लागले. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली संघाने आपापल्या गटात अव्वल स्थान पटकावून उपांत्य फेरीत धडक मारली होती परंतु १५ वर्षानंतर या फॉरमॅटमध्ये पुन्हा चॅम्पियन बनण्याचे स्वप्न अपुरे राहिले आहे. भारताला पहिला विश्वचषक जिंकून देणारे माजी कर्णधार आणि महान अष्टपैलू कपिल देव यांनी या संघाला चोकर्स म्हटले आहे.
मी फार कडक शब्दात टीका करणार नाही कारण हे तेच खेळाडू आहे ज्यांनी आम्हाला भूतकाळात सेलिब्रेट करण्याची संधी दिली आहे. पण होय आम्ही त्यांना ‘चोकर’ म्हणू शकतो. एवढ्या जवळ आल्यानंतर पुन्हा पुन्हा पराभवाला सामोरे जावे लागत आहे हे नाकारून चालणार नाही. असे वक्तव्य कपिल देव यांनी केले आहे. गेल्या सहा विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ बाद फेरीत पराभूत होऊन पाचव्यांदा स्पर्धेतून बाहेर पडला आहे.
दरम्यान, अॅडलेड ओव्हल वर खेळल्या गेलेल्या सेमीफायनलमध्ये भारतीय संघाने 6 गडी गमावत 168 धावा केल्या. अष्टपैलू हार्दिक पांड्या आणि माजी कर्णधार विराट कोहलीने अर्धशतके झळकावली. हार्दिकने 33 चेंडूत 63 तर विराटने 40 चेंडूत 50 धावांचे योगदान दिले. यानंतर इंग्लंडने 16 षटकांत एकही विकेट न गमावता लक्ष्य गाठले. कर्णधार जोस बटलर 80 आणि अॅलेक्स हेल्सने 86 धावा करून नाबाद माघारी परतला. अशाप्रकारे इंग्लंडने भारताचा पराभव केला.