जयपूर | बिकानेर येथे कौशल्यविषयावर आयोजित बैठकीत पंचायत आणि ग्रामविकास मंत्री रमेश मीणा (Ramesh Chand Meena) हे उपस्थित होते. या बैठकीत मीणा बोलत असताना बिकानेरचे जिल्हाधिकारी भगवती प्रसाद कलाल (Bhagwati Prasad Kalal) यांचा मोबाईल अचानक वाजला. त्यावेळी ते फोन उचलून बोलू लागले. हे पाहून मंत्रिमहोदयांचा पारा चढला आणि त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना भर सभेततून बाहेर काढले.
कौशल्यविषयावर मंत्री मीणा बोलत होते. यादरम्यान बैठकीत सगळ्यांचे लक्ष मंत्र्यांकडे होते. पण नेमकं याच बैठकीत जिल्हाधिकारी कलाल यांचा मोबाईल अचानक वाजला. त्यानंतर जिल्हाधिकारी फोन रिसिव्ह करून बोलू लागले. त्यावेळी मंत्री मीणा हे चांगलेच संतप्त झाले. त्यांनी जिल्हाधिकारी कलाल यांना बैठकीतून बाहेर जायला सांगितले. त्यानंतर जिल्हाधिकारीही त्यांची सूचना मानून लगेच बाहेर गेले. या बैठकीनंतर मंत्री मीणा यांनी काम कसे करावे हे सांगताना घोड्याचं उदाहरण दिलं होतं.
दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांना भर सभेतून बाहेर काढल्याची माहिती मिळाल्यानंतर एकच संताप व्यक्त केला जात आहे. राजस्थान राज्य कर्मचाऱ्यांनी अशोक गेहलोत सरकारच्या मंत्र्याविरोधात मोर्चा काढला असून, मंत्रिमहोदयांनी याप्रकरणी माफी मागावी, अशी मागणी केली आहे.