नवी दिल्ली | श्रद्धा वालकर हत्या प्रकरणानंतर संपूर्ण देश हादरला असून, संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणात आफताब पुनावाला या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. त्यात आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ”ज्या कोणी श्रद्धा वालकरची हत्या केली, त्याला सध्याच्या स्थितीत (कायद्यानुसार) कठोर शिक्षा होईल. याची काळजी दिल्ली पोलिस आणि फिर्यादी पक्ष (सरकारी पक्ष) नक्की घेईल”.
गेल्या काही दिवसांपासून श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात विविध नेतेमंडळींकडून विधाने केली जात आहे. त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विधाने केली होती. त्यानंतर अमित शहा यांनी वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, ”सध्याच्या स्थितीत श्रद्धा वालकर हत्या करणाऱ्या आरोपीला कठोर शिक्षा होईल. त्याची काळजी दिल्ली पोलिस आणि फिर्यादी पक्ष घेईल”.
दरम्यान, श्रद्धा वालकर या तरुणीची हत्या मे महिन्यात करण्यात आली होती. मात्र, या प्रकरणाची माहिती नोव्हेंबर महिन्यात समोर आली आहे. त्यावर विविध नेतेमंडळींनी विधाने केली आहेत. त्यात आता अमित शहा यांनी भाष्य केले आहे.