कोल्हापूर | कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील 40 गावांवर दावा केला आहे. त्यामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारकडून एकमेकांवर टीका टिप्पणी केली जात आहे. त्यानंतर आता कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कोल्हापूर ते निपाणी एसटी सेवा काही काळासाठी बंद करण्यात आली आहे.
बोम्मई यांनी केलेल्या विधानानंतर राज्यभरातील विविध नेतेमंडळींकडून यावर प्रतिक्रिया दिली आहे. ठाकरे गटाकडून विशेष विरोध केला जात आहे. शिवसैनिक आक्रमक झाल्याचे दिसत आहे. कर्नाटकच्या बसेसना काळे फासत ‘जय महाराष्ट्र’चे नारे त्यावर लिहिण्यात आले होते. त्यानंतर कर्नाटकने सीमाभागात त्यांची परिवहन सेवा बंद केली होती. त्यानंतर आता कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्याने परिवहन सेवा काही काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, महाराष्ट्र-कर्नाटक या दोन्ही राज्यांनी सीमाभागातील परिवहन सेवा बंद केल्याने याचा फटका हजारो प्रवाशांना बसणार आहे. या प्रश्नावर तोडगा कधी निघेल,हे येत्या दिवसांत समोर येईल.