शिमला | हिमालच प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी 12 नोव्हेंबरला मतदान पार पडलं होतं. गुजरात राज्याच्या निवडणुकीच्या मतदानानंतर हिमाचल प्रदेशचा निकाल जाहीर होणार आहे. गुजरातमध्ये आज दुसऱ्या टप्प्यातील 93 जागांसाठी मतदान पार पडत आहे. 8 डिसेंबरला निकाल जाहीर होणार असल्याने आतापासून वातावरण तापू लागले आहे. त्यात समर्थक आक्रमक झाले आहेत.
विनय शर्मा हे वकील आहेत. त्यांनी फेसबुक लाईव्ह करुन हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक काँग्रेस जिंकणार असल्याचा दावा केला. काँग्रेस ५० जागा जिंकेल, असं ते म्हणाले. याशिवाय काँग्रेसला ४४ पेक्षा कमी जागा मिळाल्यास मिशी कापणार असल्याचं ते म्हणाले. गेल्या वेळी मी पोटनिवडणुकीत काँग्रेस चार पैकी चार जागा जिंकणार असल्याचा दावा केला होता, तो खरा ठरल्याचं विनय शर्मा म्हणाले.