नवी दिल्ली | दिल्ली महानगरपालिका निवडणूक (MCD) नुकतीच झाली आणि आता या निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. यामध्ये अपेक्षेप्रमाणे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या आम आदमी पक्षाने पुन्हा एकदा किमया दाखवून दिली आहे. ‘आप’चा 134 प्रभागांत विजय झाला आहे. पण काँग्रेसला अवघ्या 9 जागा जिंकता आल्या आहेत.
250 प्रभाग संख्या असलेल्या दिल्ली महापालिकेत आम आदमी पक्षानेच सुरुवातीला आघाडी घेतली. त्यानंतर आम आदमी पक्षाच्या ‘झाडू’ची जादू चालेल असे म्हटले जात होते. त्यानंतर आता निकाल हाती आले आहेत. यामध्ये आम आदमी पक्षाला 134 जागा तर भाजपचा 104 जागांवर विजय झाला आहे. मात्र, काँग्रेसची चांगलीच पिछेहाट झाली आहे. काँग्रेसला अवघ्या 9 जागांवर समाधान मानावे लागले आहे.
दरम्यान, आम आदमी पक्षाचा दिल्ली महापालिका निवडणुकीत करिष्मा दिसला आहे. असाच करिष्मा गुजरात निवडणुकीत दिसणार का, हे पाहण्यासाठी सर्वसामान्य जनतेचे डोळे निकालाकडे लागले आहेत.