गांधीनगर | गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक यश मिळवले आहे. त्यानंतर आता गुजरातचा मुख्यमंत्री ठरला आहे. भूपेंद्र पटेल (Bhupendra Patel) यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. त्यांच्या नावावर पक्षश्रेष्ठींनी शिक्कामोर्तब केले असून, त्यांची निवड विधीमंडळ पक्षनेतेपदावर झाली आहे.
भाजपला विधानसभा निवडणुकीत एकूण 182 जागांपैकी तब्बल 156 जागांवर यश मिळाले असून, या ऐतिहासिक विजयाची नोंद झाली आहे. गुजरातचे भाजप प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांनी भूपेंद्र पटेल हेच मुख्यमंत्री राहतील, हे याआधीच स्पष्ट केले होते. त्यानंतर आता या नावावर एकमत झाले आहे. त्यानुसार, नव्या सरकारचा शपथविधी सोमवारी 12 डिसेंबरला होणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपचे सर्व महत्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, यापूर्वी भूपेंद्र पटेल हेच मुख्यमंत्री होणार असे म्हटले जात होते. तशी चर्चा देखील सुरु होती. त्यानंतर अखेर त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.