नवी दिल्ली | सध्या तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईलसह इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. देशातील सर्वच टेलिकॉम कंपन्यांकडून इंटरनेट सुविधा पुरवली जाते. सर्वाधिक 3GB पर्यंत इंटरनेट सेवा दिली जाते. पण इंटरनेट वापरताना नेट प्लॅन संपल्यावर संताप होतो. असाच संताप काँग्रेसचे खासदार जसबीर सिंह यांनी इंटरनेट प्लॅनवरून व्यक्त केला आहे.
इंटरनेट वापरताना ते कोणत्याही अडचणीविना चालावे असेच वाटते. पण अनेकदा असे घडत नाही. व्हॅलिडीटीपूर्वीच इंटरनेट संपल्याचा मेसेज येतो. असा प्रकार इतर कोणत्या व्यक्तीसोबत घडला नाही तर काँग्रेसच्या खासदारासोबत घडला. या प्रकारानंतर खासदार सिंह यांनी संसदेत प्रश्नही उपस्थित केला. ”मी वापर न करता इंटरनेट संपले. म्हणजे जेव्हा झोपतो तेव्हा काय भुताने मोबाईल डाटा वापरला का? एअरटेल आणि जियो ग्राहकांना लुटत आहेत. मी फोन बंद करून रात्री झोपलो आणि सकाळी उठल्यानंतर पाहिले की डाटा संपला. मग याचा वापर काय भुताने केला का?”
दरम्यान, काँग्रेस खासदाराच्या प्रश्नावर उत्तर देताना मंत्री वैष्णव म्हणाले की, ”तुम्ही भुताबद्दल बोलत आहात. मात्र, भूत 1GB डाटासाठी 200 रुपये घेत होते. आता 1GB डाटासाठी 20 रुपयांपेक्षाही कमी पैसे घेत आहेत”.