कोची | आयपीएल २०२३ (IPL 2023) चा लिलाव शुक्रवारी (दि.२३) होणार आहे. या लिलावात गेल्यावर्षीप्रमाणे एकूण १० फ्रेंचायझी सहभागी होणार आहे. या १० फ्रेंचायझीकडे लिलावासाठी एकूण 206.5 कोटी एवढी रक्कम आहे. एवढ्या रकमेमध्ये सगळ्या संघाला 87 खेळाडूंची निवड करण्याचा पर्याय आहे. या 87 रिक्त स्लॉट्ससाठी 991 खेळाडूंनी नोंदणी केली होती, त्यापैकी 405 खेळाडू निवडले गेले.
- IPL 2023 साठी मिनी लिलाव कुठे होणार आहे?
लिलाव कधी आणि किती वाजता सुरू होईल?
आयपीएलचा लिलाव 23 डिसेंबर रोजी दुपारी 2.30 वाजता सुरू होईल. लिलावाचे थेट प्रक्षेपण होईल का?
लिलावाचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर केले जाईल.
लिलावाचे लाईव्ह स्ट्रीमिंग देखील उपलब्ध असेल का?
या लिलावाचे लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमा अॅपवर पाहता येईल.
एकही भारतीय खेळाडू नाही
लिलावासाठी निवडलेल्या 405 खेळाडूंपैकी 273 भारतीय आणि 132 विदेशी खेळाडू आहेत. यातील 119 खेळाडूंना आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा अनुभव आहे. 19 खेळाडूंची मूळ किंमत 2 कोटी आहे. यामध्ये एकही भारतीय खेळाडू नाही.
बेन स्टोक्स, सॅम करनवर फ्रेंचायझीची नजर
11 खेळाडूंची मूळ किंमत 1.5 कोटी आणि 20 खेळाडूंची मूळ किंमत एक कोटी आहे. येत्या लिलावामध्ये अष्टपैलू खेळाडूंवर मोठ्या प्रमाणात बोली लावली जाण्याची दाट शक्यता आहे. यामध्ये काही नावे समोर येत आहे. बेन स्टोक्स, सॅम करन, कॅमेरून ग्रीन या खेळाडूंवर सर्व फ्रेंचायझीची नजर आहे.