नवी दिल्ली | केंद्र सरकारने २०१६ साली घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयावर आज सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. नोटबंदीचा निर्णय घटनाबाह्य नाही. असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. या निर्णयाला आव्हान देणाऱ्या एकूण ५८ याचिकांवर सुनावणी घेतल्यानंतर न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.
५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने कायम ठेवला. न्या. एस. ए. नाझीर यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यांच्या घटनापीठाने या प्रकरणावर हा निकाल दिला आहे.
पूर्वीचा निर्णय मागे घेता येणार नाही. नोटाबंदीच्या निर्णय प्रक्रिया तपासल्यानंतर हा निर्णय अवैध आहे असे म्हटले जाऊ शकत नाही. असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले आहे. या प्रकरणात घटनापीठाने 4:1 च्या बहुमताने निकाल दिला आहे.
न्यायमूर्ती बी.व्ही.नगररत्न यांनीच या निर्णयाला विरोध केला. नोटाबंदीची प्रक्रिया केंद्र सरकारने करायला नको होती. असेदेखील ते म्हटले आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी जनतेला संबोधित करत नोटबंदीचा निर्णय जाहीर केला होता. या निर्णयाद्वारे एका झटक्यात ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा व्यवहारातून बाद करण्यात आल्या होत्या. या निर्णयानंतर देशभरात नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला होता.