नागपूर | भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. गडकरी यांच्या नागपूर येथील कार्यालयात त्यांना धमकीचे तीनवेळा फोन आले. या प्रकाराने पोलिस प्रशासनाने खबरदारी घेत तपास सुरु केला आहे.
नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील कार्यालयात धमकीचे फोन आले. यामध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या नावाने नितीन गडकरींना धमकी देण्यात आली. तसेच दोन कोटी रुपयांची खंडणीही मागण्यात आली आहे. या प्रकारानंतर गडकरी यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.
दरम्यान, पोलिसांनी फोन करणाऱ्या व्यक्तीची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. संबंधिताचा शोध घेऊन त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल, असे सांगण्यात आले आहे.