नवी दिल्ली | पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्यात पुढील पंतप्रधान होण्याची क्षमता असल्याचे नोबेल पारितोषिक विजेते अमर्त्य सेन (Amartya Sen) यांनी सांगितले. तसेच प्रादेशिक पक्षांची भूमिका महत्त्वाची आहे. मला वाटतं द्रमुक हा महत्त्वाचा पक्ष आहे, टीएमसी देखील नक्कीच महत्त्वाची आहे, असेही ते म्हणाले.
अमर्त्य सेन म्हणाले, ”2024 च्या लोकसभा निवडणुका भारतीय जनता पक्षाच्या बाजूने एकतर्फी होतील असा विचार करणे चूक असेल. आगामी सार्वत्रिक निवडणुकीत प्रादेशिक पक्षांची भूमिका साहजिकच महत्त्वाची असेल. भाजपने भारताचा दृष्टीकोन खूप कमी केला आहे. केवळ हिंदू भारत आणि हिंदी भाषिक भारत या विचारसरणीला अतिशय प्रकर्षाने स्वीकारून भारताचे आकलन संकुचित केले आहे”.
प्रादेशिक पक्षांची भूमिका महत्त्वाची
प्रादेशिक पक्षांची भूमिका महत्त्वाची आहे. मला वाटतं द्रमुक हा महत्त्वाचा पक्ष आहे. टीएमसी नक्कीच महत्त्वाची आहे आणि समाजवादी पक्षाचाही काही प्रभाव आहे. पण तो वाढवता येईल की नाही हे मला माहीत नाही, असेही ते म्हणाले.