बंगळुरु | कर्नाटक विधानसभा निवडणुकीपूर्वी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस युडियुरप्पा यांनी मोठी घोषणा केली आहे. येडियुरप्पा निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्ती घेत आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकात सध्या मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. कर्नाटक विधानसभा निवडणुकीला अवघे दोन महिने शिल्लक असताना त्यांच्या या घोषणेमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
सध्या येडियुरप्पा हे भाजपच्या केंद्रीय संसदीय समितीचे सदस्य आहेत. त्यांनी ही घोषणा केली असली तरी राजकारणात सक्रिय राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
आगामी विधानसभा निवडणूक लढवणार नाही. तसंच भविष्यात कोणतीही निवडणूक लढवण्याचा माझा विचार नाही. मी आता 80 वर्षांचा असल्यामुळं यापुढं मी निवडणूक लढवू शकत नाही. राज्यात पुन्हा भाजपचं सरकार आणणं हेच आपलं ध्येय असल्याचं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.