नवी दिल्ली | यंदाचे G-20चे यजमानपद भारताला मिळाले आहे. पंतप्रधान मोदींच्या काळात भारताला G-20चे नेतृत्व मिळाले आणि ते यशस्वीरीत्या पार पडत आहे त्याचे पूर्ण श्रेय हे मोदींनाच मिळायला हवं असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला मुलाखत देताना केले आहे.
2024च्या लोकसभा निवडणुकीत कोणतीही स्पर्धा नाही. मोदींच्या नेतृत्वात देश पुढे जात असल्याचे देखील शाह म्हणाले.
बिहार आणि झारखंडमधील नक्षलवादाविषयी बोलताना, तेथील नक्षलवाद जवळपास संपुष्टात आला आहे. छत्तीसगडमध्येही लवकरच शांतता प्रस्थापित करण्यात आम्ही यशस्वी होऊ असा विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केला.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर-पूर्व आणि देशातील बाकीच्या भागातील लोकांच्या मनातील अंतर संपवलं आहे. एकमेकांविषयीआदराची भावना निर्माण झाला आहे. आमच्या सरकारनं सर्मसमावेशक अर्थसंकल्प सादर केला आहे. आम्ही हिंसाचार संपवला आहे. तसेच अंमली पदार्थांच्या व्यापारावर कडक कारवाई केल्याचे देखील शाह यांनी सांगितले.
2024च्या लोकसभा निवडणुकीबाबत कोणतीही स्पर्धा नाही, देश मोदींसोबत एकतर्फी पुढे जात आहे. देशातील जनतेने इतर पक्षांना लोकसभेतील विरोधीपक्ष देखील केले नाही.
असा विविध मुद्द्यांवर अमित शाह यांनी भाष्य केले आहे.