मुंबई | राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा असलेले शरद पवार यांनी नुकतीच एक मोठी घोषणा केली आहे. आता आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्ती घेणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. यामुळे कार्यकर्त्यांना मोठा धक्काही बसला आहे. शरद पवार यांनी आपल्याकडे आणखी तीन वर्षांचा कालावधी असून त्यानंतर केवळ मार्गदर्शकांच्या भूमिकेत असणार असल्याचे बोलून दाखवले.
यावेळी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये वेगळेच दृष्य पाहायला मिळाले. शेकडोच्या संख्येनं उपस्थित असणाऱ्या कार्यकर्त्यांनी पवारांना भावनिक साद घालत पवार यांना त्यांचा निर्णय मागे घेण्याविषयी सांगितले. कित्येक कार्यकर्त्यांना रडू आवरले आले. त्यांनी देखील पवारांना त्यांचा निर्णय मागे घेण्याची विनंती केली. लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडला. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कडाडून विरोध केला.
दरम्यान, राष्ट्रवादीच्या अध्यक्ष पदासाठी नवीन समिती स्थापन करण्यात येईल. ही नवीन समिती अध्यक्षाबाबत निर्णय घेईल, असे देखील शरद पवार यांनी स्पष्ट केले. आता पुढे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष कोण असणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा करताच सभागृत कार्यकर्ते नाराज झाले होते. यावेळी आम्ही राजकारणात सक्रिय राहणार नाही, असे कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले. आता यावर शरद पवार काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.