तीन दिवसांच्या स्पर्धेत ४० शहरांतील खेळाडूंमध्ये होणार १५ खेळांमध्ये सामना
पुणे | जीतो पुणे युथ विंगतर्फे राष्ट्रीय बॉल-ए-थोन युवा क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे आज फ्लेम विद्यापीठाच्या मैदानावर उद्घाटन झाले. ही स्पर्धा ११ जूनपर्यंत आहे. यामध्ये देशातील ४० शहरातील ८०० खेळाडू १५ प्रकारच्या खेळांमध्ये खेळणार आहेत.
राष्ट्रीय बॉल-ए-थोन युवा क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास जीतो अपेक्स श्रमन आरोग्यमचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विजय भंडारी, जीतो पुणे चॅप्टरचे अध्यक्ष राजेशकुमार सांकला, जीतो पुणेचे मुख्य सचिव चेतन भंडारी, जितो अपेक्सचे सचिव संजय लोढा, जितो अपेक्सचे संचालक अचल जैन, धीरज छाजेड़, जीतो अपेक्स लेडीज विंगच्या चेअरपर्सन संगीता ललवाणी, जीतो अपेक्स युथ विंगचे संचालक विनोद जैन, जितो अपेक्स युथ विंगचे अध्यक्ष गौरव धारीवाल, जीतो पुणे लेडीज विंगच्या अध्यक्षा लकीशा मर्लेचा, जीतो रोम झोनचे चेअरपर्सन अजित सेठिया, जीतो रोम झोनचे JATF चेअरमन इंद्रकुमार छाजेड़, जीतो पुणेचे सचिव दिनेश ओसवाल, खजिनदार किशोर ओसवाल, संयुक्त सचिव संजय डागा, जीतो पुणेचे युथ विंगचे कन्वेनर संदीप लुनावत, राष्ट्रीय युवा क्रीडा संयोजक दीपक जैन, जीनेश जैन, पुणे युथ विंगचे अध्यक्ष निकुंज ओसवाल, सचिव सिद्धार्थ गुंदेचा, रोम झोन युथचे कन्व्हेनर गौरव नहार, मुख्य प्रायोजक राणावत समूहाचे व्यवस्थापकीय संचालक विशाल राणावत, क्रिकेट प्रायोजक उमेश बोरा, फुटबॉल प्रायोजक विक्रम पालरेशा, बैडमिंटन प्रायोजक चेतन जैन आदी मान्यवर उपस्थित होते.
“जीतो पुणे चॅप्टरची युथ विंग असो वा लेडीज विंग… यामध्ये प्रत्येक महिन्याला काही न काही उपक्रम राबवले जातात. आपल्या देशाची ओळख म्हणजे ही युवा पिढी आहे. म्हणूनच भविष्यात देखील या युवा पिढीमुळेच जीतोची प्रगती होणार आहे.”
- राजेशकुमार सांकला (अध्यक्ष, जीतो पुणे चॅप्टर)
“या क्रीडा महोत्सवाचा हेतू हा आहे की, यानिमित्ताने सर्वजण एकमेकांशी जोडले जातील. सर्वांना एकत्र काम करण्याची संधी अशा स्पर्धेमुळे मिळते. खेळामुळे जिंकण्याची भावना मनामध्ये निर्माण होते. आपण जिंकण्यासाठी खेळायला, जगायला लागतो. त्यामुळे अशा स्पर्धा अत्यंत महत्वाच्या ठरतात.”
- विजय भंडारी (राष्ट्रीय उपाध्यक्ष, जीतो अपेक्स श्रमन आरोग्यम)
पुण्यामध्ये ऐतिहासिक कार्यक्रम होत आहे. ज्यामध्ये प्रथमच इतक्या मोठ्या संख्येने तरुण सहभागी झाले आहेत. जास्तीत जास्त लोकांनी या तरुण खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी स्पर्धा पाहण्यासाठी यावे, असे आवाहन जीतो पुणे चॅप्टरचे मुख्य सचिव चेतन भंडारी यांनी यावेळी केले.
गेले एक महिनाभर जीतो पुणे युथ विंगने या कार्यक्रमासाठी दिवसरात्र मेहनत घेतली आहे. आज तो या स्पर्धेचे उद्घाटन होतेय. आणि याला पूर्ण देशभरातून युथ सहभागी झालेले आहेत. हा आनंदाचा दिवस आहे, असे पुणे युथ विंगचे अध्यक्ष निकुंज ओसवाल म्हटले.
दरम्यान, राणावत समूहाचे व्यवस्थापकीय संचालक विशाल राणावत यांनी देखील जीतो पुणे चॅप्टरच्या युथ विंगचे कौतुक केले आहे. येथील आयोजनाबाबत बोलताना हे मिनी ऑलिम्पिक वाटू लागले आहे असेदेखील ते म्हणाले.