फुलगाव | शारदीय नवरात्रोत्सव व लोकसेवा प्रतिष्ठान शैक्षणिक उपक्रमाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त लोकसेवा संकुल फुलगाव येथे ‘नवदुर्गा सन्मान सोहळा’ मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. यामध्ये पुणे शहर व परिसरातील सामाजिक, आर्थिक, कला, क्रीडा, साहित्य, उद्योग, राजकीय, शैक्षणिक, वैद्यकीय, संगीत, प्रशासन अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या १३ कर्तृत्ववान ‘दुर्गांचा’ सन्मान करण्यात आला.
लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे व त्यांच्या पत्नी लोकसेवा प्रतिष्ठानच्या संचालिका सविता पायगुडे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम घेण्यात आला. खासदार वंदना चव्हाण या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या.
नवरात्र उत्सवानिमित्त सर्वत्र आदिशक्तीचा जागर केला जातो. त्यानिमित्ताने सतार वादक गौरी दीपक शिकारपुर, बचत गट उद्योजिका कमल परदेशी, व्यावसायिक शितल बाळासाहेब अमराळे, व्यावसायिक दीपाली मंगेश पायगुडे, भाग्यश्री निलेश पायगुडे, पोलिस उपनिरीक्षक प्रियांका रामेश्वर पवार, विद्युत अभियंता विदुला विजयकुमार देवकाते, नेत्रतज्ज्ञ डॉ. वंदना मोहिते, मुख्याध्यापिका काजल छतिजा, आदर्श सरपंच मंदानानी साकोरे, हॉटेल उद्योजिका कुसुमबाई गडधे, कुस्तीपटू कोमल गोळे यादव, हॉटेल व्यावसायिक अरुणा रामदास पायगुडे या १३ कर्तृत्ववान ‘दुर्गांचा’ खासदार वंदना चव्हाण यांच्या हस्ते श्री महालक्ष्मीचे रजत नाणे, शाल व तुळशी वृक्ष देऊन गौरव करण्यात आला. हा सोहळा फुलगाव येथील नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेत पार पडला. खासदार वंदना चव्हाण यांचा संस्थेच्या वतीने निवृत्त शिक्षिका प्रतिभा भडसावळे, मुलींची सैनिकी शाळेच्या प्राचार्या लक्ष्मी कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला.
खासदार चव्हाण यांनी लोकसेवा शैक्षणिक संकुल, सैनिकी शाळा आणि याठिकाणी उपलब्ध सुविधांचे कौतुक करतानाच गौरव झालेल्या नवदुर्गांच्या कार्याचेही त्यांनी कौतुक केले. शिक्षण संस्थेत अशा प्रकारचे कार्यक्रम घेतल्याने मुला-मुलींवर चांगले संस्कार होतील व त्यातून ही मुले घडतील, असेही त्या म्हणाल्या.
लोकसेवा प्रतिष्ठान संचलित नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळा, लोकसेवा इंग्लिश मीडियम स्कूल, टेन टी. इंटरनॅशनल स्कूल, लोकसेवा गर्ल्स मिलिटरी स्कूल, लोकसेवा कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्र उत्सवा दरम्यान घटस्थापना, समूह गायन, नृत्य, वेशभूषा, कन्या पूजन आणि नवदुर्गा सन्मान सोहळा आदी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
लोकसेवा प्रतिष्ठानचे संचालक व लोकसेवा कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य नरहरी पाटील, नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेचे प्राचार्य अमर क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे संयोजन साधना शिंदे आणि मनीषा तिरखुंडे यांनी केले. पुनम भोसले, जयश्री जरे, संगीता देशमुख, योगेश्री शिवले, ज्योती वाळुंज, रूपाली आव्हाड, शुभांगी चव्हाण, रेश्मा मांढरे, रेखा जाधव, चंदा थापा, चैत्राली जगताप, मनाली सूर्यवंशी, माधवी कुरले, वैजयंती नायक, दिपाली शेवाळे, रेखा खरात, अर्चना मोरे, वनिता म्हस्के, दिपाली भंडारी, सादिया शेख, रोहिणी शिंदे, ऋतुजा कुलकर्णी यांनी कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पल्लवी ढवळे यांनी केले.
कार्यक्रमास बाळासाहेब अमराळे, बंटी सिंग अरोरा, ज्येष्ठ पत्रकार दीपक दराडे, प्राचार्य शोपिमोन, प्राचार्य देणसिंग, उपसरपंच ज्योती गवारे, शिक्षक, पालक, परिसरातील महिला, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.