मुंबई | गेल्या काही दिवसांपासून विधानसभा अधिवेशन सुरु आहे. यामध्ये अंगणवाडी सेविकांसाठी राज्य सरकारने सकारात्मक चर्चा केली आहे. मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी पूर्वीच्या म्हणजेच १० टक्क्यावरून २० टक्क्यापर्यंत वाढ करणार असल्याचे जाहीर केले आहे. म्हणजेच किमान ८५०० वेतनावरून १५०० रुपयांची वाढ होणार आहे. आणि मदतनीस यांना ४५०० वरून १००० रुपये वाढ होणार आहे.
शासकीय मालमत्तेतील १५० करोड रुपये खर्च करून प्रत्येक अंगणवाडी सेविकेला नवीन मोबाईल देखील देण्यात येणार आहे. तर रिक्त असलेली पदे देखील भरण्यात येणार आहे. अशी माहिती मंत्री लोढा यांनी दिली.
अंगणवाडी सेविकांसाठी सेवा समाप्तीनंतर पेन्शन योजनाही सुरु केली जाणार आहे. अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नाबाबत तातडीची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत घेण्यात आली असेदेखील लोढा म्हटले आहे.
दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील अंगणवाडी सेविकांनी आंदोलन केले होते. सर्व स्तरावरून अंगणवाडी सेविका आक्रमक झाल्या होत्या. परंतु आता मात्र त्यांनी आंदोलन मागे घेतले आहे.