मुंबई | सब टीव्हीवरील ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ हा शो प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. या शोमधील सर्वच कलाकार आपल्या उत्तम अभिनयाने चर्चेत असतात. पण याच शोमध्ये दयाबेनची (Dayaben) भूमिका साकारणाऱ्या दिशा वाकानी यांना कॅन्सर झाल्याची चर्चा सुरु आहे. यावर जेठालाल म्हणजेच दिलीप जोशी (Dilip Joshi) यांनी ही एकप्रकारची अफवा आहे. त्यावर कोणीही लक्ष देऊ नये, असे म्हणत कॅन्सरचे वृत्त फेटाळून लावले.
‘तारक मेहता’ शोमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून दिशा वाकानी दिसत नाही. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना त्यांची प्रतिक्षा आहे. अनेकदा दयाबेन पुन्हा येणार अशा बातम्या येत होत्या. मात्र, अद्यापही दयाबेनची शोमध्ये ‘एँट्री’ झालेली नाही. त्यानंतर आता त्यांना कॅन्सर झाला असल्याची अफवा पसरत आहे. त्यावर दिलीप जोशी यांनी सांगितले की, ‘मलाही अशाप्रकारची विचारणा करणारे फोन येत आहेत. अनेकवेळा काही ना काहीतरी बातम्या येत आहेत. पण मला वाटते या गोष्टीला प्रोत्साहन देण्याची गरज नाही. मी फक्त इतकेच सांगू इच्छितो की, ही अफवा आहे. यावर लक्ष देऊ नये’.