मुंबई | ‘बिग बॉस ओटीटी’ मधून प्रसिद्धी मिळालेली मॉडेल उर्फी जावेद कायम तिच्या विचित्र कपड्यांमुळे चर्चेत असते. परंतु सोशल मीडियावर सतत चर्चेत असलेली उर्फीवर टीका करत भाजप नेत्या चित्र वाघ यांनी तिच्या अटकेची मागणी केली आहे. उत्तानपणे नंगटपणा करणाऱ्या या बाईला रोखण्यासाठी पोलिसांकडे कायदे आहेत की नाही? असा सवाल देखील चित्रा वाघ यांनी केला आहे.
महिला आयोगाला हे दिसत नाही का? असा खोचक टोला देखील त्यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना लगावला आहे.
चित्रा वाघ यांनी केलेल्या ट्विटनंतर उर्फीने देखील त्याला सडेतोड उत्तर दिले आहे. वाघ यांच्यानंतर उर्फी जावेद हिच्याविरोधात महिला संघटना देखील आक्रमक झाल्या आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या विचित्र कपड्यांवर एकीकडे वाद सुरु आहे, तर दुसरीकडे उर्फीच्या चाहत्यांची संख्या मात्र मोठ्या संख्येने वाढली आहे. उर्फीच्या ट्विटर आणि इन्स्टाग्रामवरील फॉलोअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे.
दरम्यान, चित्रा वाघ आणि उर्फी यांच्यामध्ये चांगलीच जुंपली आहे. उर्फीच्या विचित्र कपड्यांविरोधात चित्रा वाघ यांनी आवाज उठवला. त्यांनी तिच्याविरोधात तक्रार दाखल केली आणि न्युडिटी पसरवल्याबद्दल अटकेची मागणी केली आहे. त्यामुळे या प्रकरणी पुढे काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.