पुणे | पुणे जिल्ह्यातील हडपसर येथील शेवाळवाडी मध्ये दोन बाल मैत्रिणींनी आत्महत्या केल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे, एकीने गळफास घेतला आणि तिला रुग्णालयामधून घेऊन जातानाच त्याच ठिकाणी दुसरीने इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सानिका हरिश्चंद्र भागवत (वय- 19 ) आणि आकांक्षा औदुंबर गायकवाड (वय- 19) अशी आत्महत्या केलेल्या दोन मैत्रिणींची नावं आहे. शेवाळवाडी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेजवळ क्रिस्टल सोसायटी या इमारतीत सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास ही घटना घडली.