पुणे | पुण्याचे पोलीस आयुक्त अभिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहर पोलीस आयुक्तालयाकडे महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत केलेली सन-२०२२ या वर्षातील ३७ वी नोंद तसेच तब्बल १०० वी कारवाईची नोंद झाली. पोलीस आयुक्त अभिताभ गुप्ता यांनी पुणे आयुक्तालयाचा कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देऊन शरीराविरुद्ध, मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणारे व समाजामध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेऊन गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश दिले आहे.
सप्टेंबर २०२० ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीत मोक्का अंतर्गत करण्यात आलेली कारवाई
कालावधी एकूण मोक्का आरोपी
२० सप्टेंबर २०२० ते डिसेंबर २०२० ०७ ५४
जानेवारी २०२१ ते डिसेंबर २०२१ ५६ ४००
जानेवारी २०२२ ते ०७ ऑक्टोबर २०२२ ३७ २१६
एकूण १०० ६७०
लोन ॲपच्या माध्यमातून कशी करतात फसवणूक ?
लोन ॲप्लिकेशन्स युजरच्या हँडसेट मध्ये डाउनलोड करून ते चालू झाल्यानंतर युजर हँडसेटचा
कॅमेरा, काँटॅक्स, लोकेशन, एस.एम. एस, स्टोरेज, मायक्रोफोन, गॅलरी या परमिशन मिळवण्याबाबतचा मेसेज मोबाईलच्या होम स्क्रीनवर प्राप्त होतो. या सर्व परमिशन युजरने दिल्यानंतर युजरच्या हँडसेट मधील सर्व डेटाचा ॲक्सेस संबंधित लोन अप्लिकेशन्स पुरवणाऱ्या कंपनीत जातो.
सदर डेटाचा ॲक्सेस मिळाल्यानंतर तो सर्व डेटा संबंधित कंपनी क्लोन करून त्याच्या सर्व्हरवर साठवून ठेवते. कर्जाची रक्कम प्रोसेसिंग फी वजा करून युजरच्या अकाउंट मध्ये डिपॉझिट झाल्यानंतर ७ दिवसांच्या आत त्यावर ३० ते ३०० टक्क्यांपर्यंत अधिकचे व्याज आकारून त्याची परतफेड करण्यास सांगतात. युजरने जर कर्जाची रक्कम व त्यावरील आकारलेली मुद्दल व व्याजाची रक्कम भरून देखील कंपनीने नेमलेल्या कॉलरकडून युजरला पुन्हा पैसे भरण्यासाठी कॉल येण्यास सुरुवात होते. या कॉलवर सक्तीने पैसे भरण्यासाठी मानसिक त्रास दिला जातो.
मोक्का कारवाईमध्ये पुणे शहरातील खालील कुप्रसिध्द टोळी मधील गुन्हेगारांचा समावेश आहे. त्यांची नावे पुढीलप्रमाणे-
बंडू आंदेकर,निलेश घयवाळ,सचिन पोटे,बापू नायर,सुरज ठोंबरे, महादेव अदलिंगे,अक्रम पठाण
अशा एकूण १०० गुन्ह्यांमध्ये सर्वात जास्त गुन्हा खुनाचा प्रयत्न करणाऱ्यांची संख्या ४६ आहे. तर दरोडा २८, खंडणी १०, खून ९, इतर ४ आणि दारूबंदी ,एन.डी.पी.एस(गांजा), लोन ॲप फसवणूक असे प्रत्येकी १ गुन्ह्यांची नोंद झाली आहे तर ह्या सर्व गुन्ह्यांमध्ये तब्बल ६७० आरोपींना अटक करण्यात आली आहे.