पुणे | ‘जीतो श्रमण आरोग्यम् अपेक्स’च्या व्हाईस चेअरमनपदी विजय भंडारी (Vijay Bhandari) यांची नियुक्ती झाली आहे. तर,चेअरमनपदी अहमदाबाद येथील प्रकाश संघवी व प्रेसिडेंटपदी बंगळुरुचे रमेश हरन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जैन धर्माच्या चारही पंथाच्या संत, साधू व साध्वी महाराजांच्या आरोग्याची काळजी ‘जीतो श्रमण आरोग्यम् अपेक्स’ घेते. चार पंथांचे देशभरात १४ हजारांहून अधिक साधू व साध्वी महाराज आहेत. त्यांच्या आरोग्य उपचारासाठीचा सर्व खर्च जीतो श्रमण आरोग्यमतर्फे होत असतो. यामध्ये शस्त्रक्रिया अथवा इतर कोणत्याही प्रकारच्या आरोग्य उपचाराचा खर्च केला जातो. आतापर्यंत ६७०९ साधू-साध्वी महाराजांची याअंतर्गत सेवा केली असून, त्यासाठी ५० कोटी रुपयांहून अधिक खर्च आला आहे. श्रमण आरोग्यम हा जीतोमधील अत्यंत महत्वाचा विभाग समजला जातो.
जैन साधू व साध्वी महाराजांच्या आरोग्य उपचारासाठी जीतोच्या वतीने फंड स्वरुपात रक्कम ठेवली आहे. आगामी काळात जीतोच्या वतीने साधू-साध्वींसाठी नवीन योजना हाती घेण्यात येत आहेत. यामध्ये साधु व साध्वी महाराजांना दररोज लागणारी औषधे देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच, जैन साधु-साध्वी महाराज पायी विहार करीत असतात. देशांतर्गत विहार करीत असताना त्यांना बऱ्याच ठिकाणी थांबण्याची व्यवस्था नसते. त्यामुळे अशा ठिकाणी विहारधामची योजना श्रमण आरोग्यमच्या वतीने राबविण्यात येणार आहे.