पुणे | जीतो पुणे चॅप्टर नवीन कार्यकारिणाचा (२०२२-२०२४) दिमाखदार शपथविधी सोहळा मंगळवारी सायंकाळी संपन्न झाला. यावेळी अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध उद्योजक व सिद्धीविनायक ग्रुपचे प्रमुख राजेशकुमार सांकला तर, मुख्य सचिव म्हणून बी जे भंडारी ग्रुपचे संचालक चेतन भंडारी यांच्यासह संपूर्ण कार्यकारिणीने शपथ घेतली.
कोरियंथन क्लब येथे हा शपथविधी समारंभ पार पडला. यावेळी जीतो अपेक्सचे चेअरमन सुखराज नहार, जीतो अपेक्सचे व्हाईस चेअरमन राजेंद्र छाजेड, जीतो अपेक्सचे अध्यक्ष अभयकुमार श्रीश्रीमल, जीतो अपेक्स श्रमन आरोग्यचे व्हाईस चेअरमन विजय भंडारी, जीतो अपेक्सचे उपाध्यक्ष कांतिलाल ओसवाल, जीतो अपेक्सचे मुख्य सचिव मनोज मेहता, सचिव संजय लोढा, अपेक्स संचालक अचल जैन, सतीश हिरेन, धीरज छाजेड, जीतो अपेक्स लेडीज विंगच्या चेअरपर्सन संगीता ललवाणी, सल्लागार समितीमधील देवीचंद जैन, विजयकांत कोठारी, अजय मेहता आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा शपथग्रहण समारंभ झाला. यावेळी जीतोचे पुण्यातून ऐतिहासिक 56 सदस्य झाले आणि त्याची घोषणा विजय भंडारी व रवी सांकला यांनी केली.
जीतो पुणे चॅप्टरची कार्यकारिणी (२०२२ ते २०२४)
अध्यक्ष – राजेशकुमार सांकला
मुख्य सचिव – चेतन भंडारी
उपाध्यक्ष – अशोक हिंगड, सुदर्शन बाफना, विनोद मांडोत, मनोज छाजेड, नरेंद्र छाजेड
सचिव – दिनेश ओसवाल, सहसचिव – संजय डागा
खजिनदार – किशोर ओसवाल
सहखजिनदार – दिलीप जैनजीतो लेडीज विंग पुणे
अध्यक्ष – डॉ लकिशा मर्लेचा
मुख्य सचिव – मोना लोढा
उपाध्यक्ष – पूनम ओसवाल, विमल बाफनाजीतो युथ विंग पुणे
अध्यक्ष – निकुंज ओसवाल
मुख्य सचिव – सिद्धार्थ गुंदेचा
उपाध्यक्ष – गौरव बाठिया, आकाश ओसवालसंचालक
रवी सांकला, लक्ष्मीकांत खाबिया, मिलन दर्डा, राहुल सांकला, ऋषभ सांकला, अॅड. रविंद्र दुगड, सीए सुहास बोरा, संतोष जैन, सचिन जैन, उपेश मर्लेचा, विकास भटेवरा, अॅड. विशाल शिंगवी, अॅड. योगेश मेहता, हितेश शहा
‘जीतो’ संस्था जैन समाजातील चारही पंथांना एकत्रित आणणारे सर्वात मोठे व्यासपीठ आहे. सेवा, शिक्षण आणि आर्थिक सशक्तीकरण हे जीतो संस्थेचे ब्रीद आहे. त्यानुसार ही संस्था काम करते. देशभरात जीतोचे ६४ चॅप्टर असून परदेशात ११ चॅप्टर आहेत.
जीतो अपेक्सचे चेअरमन सुखराज नहार म्हणाले की, जीतो चा उद्देष शिक्षा, सेवा आणि आर्थिक सुदृढता असून ७५० करोड रुपयांची फिक्स डिपॉझीट असलेल्या जीतोकडून सामाजिक कार्याची उंची गाठण्याची अपेक्षा समाजाला आहे. जीतोमुळे आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक विकासाची संधी मिळते आहे. त्यामुळे अधिकाधिक सदस्य जीतोला जोडले जात आहेत. उद्योग व व्यवसायासाठी जगात आता भारतात सर्वाधिक संधी आहे.
जीतो अपेक्सचे अध्यक्ष अभयकुमार श्रीश्रीमल यांनी जीतो पुणे चॅप्टरच्या कार्याचे कौतुक करताना नवीन कार्यकारिणीकडून अपेक्षाही व्यक्त केल्या. जीतोमुळे जैन समाजातील चारही पंथ एकाच व्यासपीठावर आले आहेत. समाजाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी जीतो सर्वोत्तम व्यासपीठ ठरत आहे. त्यामुळे देशभरात जीतोशी जोडून घेण्याची इच्छा जैन समाजातील प्रत्येकाला होत आहे. महिलांचा जीतोमधील सहभागही गौरवास्पद आहे.
जीतो अपेक्स श्रमन आरोग्यचे व्हाईस चेअरमन विजय भंडारी म्हणाले की, जीतो अपेक्सला नेहमीच पुणे चॅप्टरकडून अपेक्षा राहिल्या आहेत आणि पुणे चॅप्टरने त्या पूर्ण केल्या आहेत. २०१६ आणि त्यानंतर २०२२ मध्ये यशस्वीपणे जीतो कनेक्ट आंतरराष्ट्रीय संमेलन आयोजित करून पुणे चॅप्टरने नवीन बेंचमार्क निर्माण केले आहेत. जैन समाजाचा सर्वांगीण विकास साधतानाच सामाजिक कामाचे नवे आयाम जीतोद्वारे निर्माण केले जात आहेत. सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी कार्य करणारी देशातील सर्वात मोठी संस्था म्हणून जीतोकडे पाहिले जाऊ लागले आहे.
जीतो पुणे चॅप्टरच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या राजेशकुमार सांकला यांनी सर्वांना धन्यवाद देतानाच जीतो पुणे चॅप्टरचे कार्य आहे त्यापेक्षा अधिक उंचीवर नेण्याचा विश्वास व्यक्त केला. जीतोनगर, जीतो स्कूलसह अनेक उपक्रम मार्गी लावण्याबरोबरच शिक्षा, सेवा आणि आर्थिक सशक्तीकरणामध्ये जीतो पुणे देशभरात आदर्श काम करेल. तरुणांना उद्योगात आणण्याबरोबरच घर घर जीतो ही मोहिम राबविली जाणार असल्याचेही सांकला यांनी सांगितले.
जीतोमध्ये महिलांचा सहभाग वाढत आहे. येणाऱ्या काळात महिलांकडून अधिक भरीव कामगिरी होण्यासंबंधी जीतो अपेक्स लेडीज विंगच्या चेअरपर्सन संगीता ललवाणी यांनी विश्वास व्यक्त केला.
जीतो पुणेचे मावळते अध्यक्ष ओमप्रकाश रांका व मुख्य सचिव पंकज कर्नावट यांनी मागील दोन वर्षाच्या कालखंडात केलेल्या कार्यासंबंधी माहिती दिली.
दिनेश ओसवाल यांनी सूत्रसंचालन केले. मुख्य सचिव चेतन भंडारी यांनी आभार मानले आणि यापुढील काळात समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी जीतो पुणे काम करेल असा विश्वास दिला.