परभणी | परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यात अपघाताची एक भीषण घटना घडली. भरधाव वेगात येणाऱ्या टेम्पोने दुचाकीला जोरधार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीवर असलेल्या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर टेम्पो चालकाने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्थानिक नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. बालाजी भारत गायकवाड (वय 23) भाऊसाहेब महादेव सागडे (वय 22) अशी मृत्युमुखी पडलेल्या तरुणांची नावे आहेत. दोघेही तरुण सेलू तालुक्यातील लाडनांद्रा गावातील रहिवासी आहेत. प्राप्त माहितीनुसार, दोघेही तरुण दुचाकीवरून जात असताना, पाथरी रोडवरील पान्हेरा पाटीजवळ भरधाव वेगात येणाऱ्या टेम्पोने दुचाकीला जोरदार धडक दिली ही धडक इतकी भीषण होती की दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, अपघातानंतर टेम्पो चालकाने घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्थानिक नागरिकांनी धाव घेत टेम्पोचालकाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं. टेम्पोच्या धडकेत एकाच गावातील दोन जीवलग मित्रांचा मृत्यू झाल्याने सेलू तालुक्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे.