पुणे | जवळपास चार दशके टाटा स्टीलशी निगडित असणारे व भारताचे ‘ स्टील मॅन’ म्हणून विख्यात असणारे उद्योगपती जमशेद जे. इराणी यांचं सोमवारी रात्री निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. टाटा स्टीलकडून निवेदन प्रसिद्ध करत त्यांच्या निधनाचं वृत्त देण्यात आले आहे.
२०११ साली टाटा स्टीलच्या संचालक मंडळामधून जमशेद इराणी यांनी निवृत्ती घेतली होती. ४३ वर्षे त्यांनी हे काम पाहिलं होतं. त्यांच्या कर्तृत्त्वामुळे कंपनीने आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय व दर्जेदार काम केले. त्यांचा जन्म नागपूरमधला असून परदेशात जाऊन त्यांनी पुढील शिक्षण घेतलं.
जमशेद जे इराणी यांच्या करिअरचा श्री गणेशा ब्रिटीश आयर्न अँड स्टील रिसर्च असोसिएशनमधून १९६३ साली झाला.
इराणी यांनी भारतात परतून टाटा स्टील कंपनीसोबत काम सुरु केले. टाटा ग्रुपच्या काही कंपन्यांचे संचालक म्हणूनही काम पाहिलं आहे. इराणी यांच्या पश्चात त्यांची पत्नी डेझी आणि तीन मुलं जुबिन, निलोफर आणि तनाझ असा परिवार आहे.