पुणे | येरवडा येथील कारागृहात पाच कैद्यांमध्ये भांडण सुरु झाले ते भांडण सोडविण्यासाठी पोलीस हवालदार गेले असता त्या पोलिस हवालदाराला पाच कैद्यांनी फरशीचे तुकडे आणि दगडांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. यामुळे येथील परिसरात खळबळ उडाली आहे. हनुमंत श्रीमंत मोरे असे मारहाण करण्यात आलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवडा कारागृहातील हॉस्पिटल सेप्रेट ७ जवळ असलेल्या बराक नंबर २७ ते ३१ या बराक जवळ मंगळवारी सकाळच्या सुमारास न्यायालयीन बंदी समीर शकील शेख, बंदी तरंग राकेश परदेशी, बंदी निलेश श्रीकांत गायकवाड, बंदी पुरुषोत्तम राजेंद्र वीर आणि बंदी देवा नानासो जाधव या पाच कैद्यांमध्ये भांडण सुरू होती. ती घटना समजताच पोलिस हवालदार हनुमंत श्रीमंत मोरे हे भांडण सोडवण्यास गेल्यावर, त्या पाच कैद्यांनी हनुमंत श्रीमंत मोरे यांना मारहाण केली आहे. या घटनेत मोरे जखमी झाले आहे.
दरम्यान, या घटनेचा अधिक तपास येरवडा पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक अशोक काटे करीत आहे.