नाशिक | देशात प्राणीप्रेमींची संख्या मोठी आहे. आपल्या घरात कुत्रा, मांजर यांसारखे प्राणी पाळणारेही अनेक आहेत. पण नाशिकच्या मालेगावात एका व्यक्तीने मांजर समजून चक्क बिबट्याचा बछडा पाळला. जेव्हा या बछड्याची प्रकृती बिघडली. तेव्हा रेस्कू फाऊंडेशन टीमला याची माहिती मिळाली आणि तेव्हाच त्या व्यक्तीला बिबट्याचा बछडा पाळल्याचे समजले.
मांजर समजून बिबट्याचं पिल्लू त्या व्यक्तीने पाळले होते. जेव्हा त्या पिल्लांची मरणासन्न अवस्था असल्याने या व्यक्तीला मांजर आणि बिबट्या यातला फरक समजला नाही. त्याने या पिल्लांला मांजराप्रमाणे सांभाळायचा प्रयत्न केला. पण त्याची तब्येत बिघडत होती. अखेर त्याने नाशिक वन विभागाकडे हे पिल्लू सोपवले. त्यानंतर नाशिक वन विभागाने ते पुण्यातील रेसक्यू फाऊंडेशनकडे आले. त्यांनी महिन्याभरातच या पिल्लावर उपचार केले आणि पाच महिन्यांत बिबट्याचा बछडा ठणठणीत बरा झाला.
सहा महिन्यांपूर्वी बिबट्या आढळला ग्रामीण भागात
बिबट्याचा बछडा सहा महिन्यांपूर्वी मरणासन्न अवस्थेत मालेगावच्या ग्रामीण भागात आढळला होता. त्याची तब्येत अत्यंत खराब होती. बछडा जगेल की नाही अशी शक्यता निर्माण झाली होती. मात्र, जेव्हा या बछड्याला नाशिक वन विभाग आणि इको या संस्थेच्या माध्यमातून पुण्याच्या रेस्क्यू फाऊंडेशनकडे सुपूर्द करण्यात आले. तेव्हा बछडा बरा झाला.